Tuesday, 6 August 2013

तुझी व्याख्या कधी शब्दातं करु शकेन असं अजुनही वाटतं नाही..
एक जन्मं कसा पुरेल हे कोडं उकलळ्यासाठी ?

उत्तरं शोधता शोधता सारे प्रश्नचं बदलुनं जातात..
पुन्हा पडलेले प्रश्नं सुद्धा तुझ्यासमोर जरा घाबरतच उभे राहतातं..

आणि.. दिलीस जरी उत्तरं तरी ती कुणाला समजतातं ?
फार अर्थ नसलेले शब्दंही गोड वाटतात..
कारण एकचं - ते तुझे असतातं.

तुझ्या विरहातं आसवांचे झरे काही आटतं नाहीतं..
रोजं गिरवुनं आयुश्यातले प्रश्नं काही सुटतं नाहीत !

तुझी व्याख्या कधी शब्दातं करु शकेन असं....
अजुनं तरी वाटतं नाही.
पुन्हा एकदा परत ये ,
आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ,

Sunday, 4 August 2013




तुझ्याविना जगताना 


मी तुझीच होऊन गेले 

हातात हात असताना 


हात कधीच मागे सुटून गेले....




तुझ्यावर प्रेम करत गेले मी 


अन....


तुला ते सांगताना शब्दच सारे हरवून गेले ....



तुझ्या प्रीतीच्या खेळत 


मी सख्या नेहमीच डाव हरत गेले 


तुझी होता होता आज माझेही मी न राहून गेले ....... 




तुझ्याविना जगताना 


मी तुझीच रे होऊन गेले .........